नांदेड (प्रतिनिधी )- हडको परिसरातील तब्बल चाळीस वर्षापुर्वी स्थापण केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, नवीन नांदेड च्या कार्यकरणीची घोषणा न्यायलयाच्या व धर्मदाय कार्यालयाच्या अधिन राहुन दि २४ रोजी घेण्यात आली . यात नव्याने शिवप्रसाद भराडे यांना अध्यक्ष , तुकाराम देव उपाध्यक्ष , नारायण कंदमवार यांची सचिव यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणुक अधिकारी डी जी कर्णे यांनी केली .
हडको येथील शिक्षण प्रसारक मंडळाची नव्या कार्यकारणीची घोषणा
तब्बल चाळीस वर्षानंतर कार्यकारणी घोषणा
सिडको – हडको परिसराची उभारणी झाल्यानंतर येथील नागरिकाच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हडको परिसरातील २० नागरिकांनी एकञ येत १९८४ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ , नवीन नांदेड स्थापण करुन पाचवर्षासाठी मंडळाची कार्यकारणीची घोषणा केली होती . या कार्यकारी मंडळानी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उभी करत परिसरातील विद्यार्थांना शिक्षणाची दारे खुली केली . त्यानंतर उच्च माध्यमीक शिक्षण देताना पाचवी ते आठवी वर्गाची मान्यता मिळवुन शिक्षण देत आहेत . तत्कालीन स्वारातीम विद्यापिठाचे उपकुलसचिव लक्ष्मणराव लिंगपल्ले यांनी पंचवार्षीक निवडणुक घेण्याची व कार्यकारणीत बदलासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे १९९४ रोजी मागणी केली होती . त्यानंतर लक्ष्मणराव लिंगपल्ले यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या शिक्षण प्रसारक मंडळाची पुन्हा बैठक किवा निवडणुक झाली नाही . त्यानंतर प्रा गणेश लिंगपल्ले व नारायण कंदमवार यांनी धर्मदाय आयुक्ताकडे धाव घेत या संस्थेच्या कार्यकारणीची निवडणुकीची मागणी करत त्यांनी न्यायलयात दावा दाखल केला होता . न्यायलयाने धर्मदाय आयुक्तांना या संस्थेच्या कार्यकारणी निवडीची घोषणा केली . दि २४ रोजी हडको येथील विद्यानिकेत शाळेत संचालक मंडळाची निवडणुक घेतली . यात २० संचालक मंडळा पैकी ११ संचलकांनी सहभाग नोंदवला होता . त्यात दोन संचालकानी या प्रक्रियेवर अक्षेप घेवुन सभेतुन सभात्याग केला . उर्वरीत नऊ संचालकात निवडणुकीची घोषणा केली . यात अध्यक्षपदासाठी शिवप्रसाद मोतीलाल भराडे , उपाध्यक्ष तुकाराम गंगाराम देव , सचिवपदी नारायण समन्ना कंदमवार , सहसचिव रावसाहेब किशनराव कुलकर्णी , कोषाध्यक्ष अंनतराव माधवराव जोशी , सदस्य विनोदकुमार रामकिशन खरे , रत्नाकर दासराव जोशी याचे यापदासाठी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणुक अधिकारी तथा धर्मदाय आयुक्त निरिक्षक जी कर्णे यांनी हि निवड झाल्याची घोषणा केली . यावेळी सहाय्यक निवडणुक अधिकारी के पी तुप्पेकर , एन बी सावळे यांची उपस्थिती होती .
या कार्यकारणीमुळे तब्बल चाळीस वर्षानंतर या संचालकाना न्याय मिळाला आहे . त्यामुळे तब्बल चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा मिञाची या निमित्यांने भेट झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला .
यावेळी प्रा.गणेश लिंगमपल्ले गजानन पाटील लोंढे, राजेश कंदमवार, संतोष भराडे, श्रीकांत कुलकर्णी, गजानन कुलकर्णी, संभाजी आलेवाड, श्रीकांत आलेवाड, बालाजी आलेवाड, अविनाश आलेवाड, रविकांत आलेवाड, संदीप शेंडगे योगेश देव, दुर्गादास जोशी, प्रसाद जोशी, बाळू शिंदे, शैलेश पाटील, नागेश आसेगावे यांची उपस्थिती होती.