महावीरने महिलेवर अत्याचार करुन केली फसवणूक

आठ महीने होता फरार पण अखेर झाला गजाआड 

नांदेड,(प्रतिनिधी)- महीलेवर आत्याचार करुन मागील 8 महीने फरार असलेला गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अत्यंत दक्ष प्रभारी पोलीस अधिक्षक श्री विजय कबाडे साहेबांच्या कुशल मार्गदर्शनात अखेर जेरबंद केला.

सन 2021 मध्ये पोलीस ठाणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 299/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 376,420,406 , 507 नूसार दाखल झाला होता. एव्हाना वाचकांना कळलेच असेल की या प्रकरणातील गुन्हेगाराने महीलेवर अत्याचार करुन तीची फसवणूक केली होती. त्या महीलेवर अत्याचार करणारा गुन्हेगार महावीर विठ्ठल साळवे (26) रा.किन्होळा ता.वसमत जिल्हा परभणी हा गुन्हा दाखल होताच पळून गेला होता.

विमानतळ पोलीस त्याचा माग काढतच होते.आपल्या प्रयत्नात पोलीसांनी सायबर सेलच्या पथकाची मदत घेवून तांत्रीक मदतीने केलेल्या मेहनतीला अखेर आज यश आले. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक अनलदास, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, बंडू कलंदर पाटील, दत्ता गंगावरे यांच्या पथकाने महावीर विठ्ठल साळवे यास गंगाखेड जिल्हा परभणी येथून पकडून आणले आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करुन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस कोठडी मागीतली जाणार आहे. 8 महिन्यांपासून महिलेवर अत्याचार करुन तीची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला गजाआड करणाऱ्या विमानतळ पोलीसांचे पोलीस उप महानिरिक्षक निसार तांबोळी यांनी कौतूक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *