नांदेड,(प्रतिनिधी)- लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कार्यवाही नंतर माझ्या पतीवर खोटा गुन्हा दाखल करून रात्री बेरात्री मला घरी येऊन वाईट नजरेने पाहणारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्रीमान अशोकरावजी घोरबांड यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करा असे निवेदन एका पत्नीने पोल्स अधीक्षक कार्यालयात दिले आहे.
लोहा येथील रहिवाशी सौ.वर्षा रमेश माळी यांनी आज २५ जुलै २०२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक निवेदन दिले आहे.त्यानुसार ६ जून २०२२ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिव पाटीलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले.तेव्हा १० जून २०२१ रोजी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांची बदली तोंडी आदेशाने पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आली होती.पण पैसा आणि राजकीय पुढाऱ्यांचा दांडगा संपर्क वापरून श्रीमान अशोकरावजी घोरबांड साहेब पुन्हा १ जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोल्सी ठाण्यात तोंडी आदेशानेच रुजू झाले.,मुळात शिवा पाटीलवर झालेला अँटी करप्शनचा ट्रॅप संतोष वरपडेने घडवला होता.तरी माझा पती रमेश माळी विरुद्ध ४ जुलै रोजी खोटा गुन्हा क्रमांक ३९५/२०२२ दाखल केला.माझे पती ५ जुलै पासून फरार आहेत.
माझे पती रमेश माळी यांनी मला फोन करून सांगितले आहे की,पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांकडून आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.तसेच रात्री बेरात्री घरी येऊन मला मानसिक त्रास देत आहेत.वाईट नजरेने पाहत आहेत.माझे पती रमेश माळी यांना काही झाले तर सिडको नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब जबाबदार राहतील.या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि मला व माझ्या परिवाराला म्याचे द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या विषयात सुपारी देवून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्या बाबत असा विषय लिहिलेला आहे.
वास्तवाचे वृत्त खरेच ठरले
वास्तव न्यूज लाइव्हने प्राप्त झालेल्या खात्रीलायक सूत्रांच्या आधारावर ‘पॉलिसीची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली तर तुमची सुपारी दिली जाईल’ या मथळ्याखाली बातमी दिनांक २२ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केली होती.ती वास्तव न्यूज लाईव्हची बातमी आज सौ.वर्षा रमेश माळी यांनी आज दिनांक २५ जुलै २०२२ रोजी दिलेल्या निवेदनाने तीन दिवसात सत्यच ठरली आहे. आपल्या नावाप्रमाणे आम्ही फक्त आणि फक्त वास्तवच लिहितो.