स्वतंत्र महाराष्ट्र चळवळील शाहीर अण्णाभाऊ साठेंचे स्थान 

माझ्या महाराष्ट्राचे व स्वतंत्र गोवा राज्याचे मान्यवर जनता व राजकीय लाभ लाटणाऱ्या लुटणाऱ्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांच्या घश्यातून मुंबई व गोवा राज्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ओरबडून काढून घेतले आहे.म्हणुन आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई व स्वतंत्र गोवा राज्य अस्तित्वात असल्याचे दिसते आहे.ते फक्त आणि फक्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी मुळेच.

म्हणून त्यांनी मुंबईला ‘ माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती ही काहिली ‘ अशी भारदस्त छकड महाराष्ट्राच्या निधड्या छातीवरल्या डफावर ठणकावलेली थाप आहे. मैना म्हणजे त्यांची कांही प्रेयसी नव्हती.तर ती फक्त आणि फक्त उपेक्षित, शोषीत,पिडीत, गरीब,श्रमिक, कष्टकरी व व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची अन्न दाती व महाराष्ट्राची आन,बांध,शान मुंबई होती.एवढेच नाही तर लोक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा रशिया सारख्या प्रगल्भ देशात गाऊन मराठी भाषेला साता समुद्रापार नेले.

म्हणून मुंबई महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई विद्यापीठाला महान स्वातंत्र्य सेनानी,थोर समाजसुधारक व एक ना अनेक सुभाषित व उपाद्यानी प्रचलित असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव देण्यात यावे.हाच तुमचा मुंबई सह मराठी अस्मितेचा बाणा राहिलं.

ही स्वातंत्र्य सेनानी,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मनःपूर्वक भावपूर्ण आदरांजली व उपेक्षित वंचित अनुयायायांची पोटतिडक आहे.

जय अण्णा, जय मराठी,जय महाराष्ट्र जय भारत.

लेखक-डी.एन.मोरे खैरकेकर.

भ्र.९९२३८४२०२५,- ९१३०७३०५६७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *