नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांसह शहरातील अनेक पोलीस ठाण्यांनी आप-आपल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज पथसंचलन केले. शहरातील शांततेला धोका निर्माण करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना समज देता यावी म्हणून शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज पथसंचलन केले. शहरात आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. यादाखवण्यासाठीच हे पथसंचलन काढण्यात आले. वजिराबाद पोलीसांच्या पथसंचलनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचे नेतृत्व होते.
