नांदेड (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात खून करून पसार झालेल्या एका युवकाला विमानतळ नांदेड पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्त मोहिमेत गजाआड केले आहे.
पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा क्र. 107/2022 हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 302, 364 आणि 34 नुसार दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक सचिन गायकवाड वय 19 हा बालाजीनगर नांदेड येथे असल्याची माहिती घेऊन बीड पोलीस नांदेडला आले. विमानतळचे पोलीस निरीक्षक अनिरूद्ध काकडे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी बीड पोलिसांसोबत आज सकाळी संयुक्त मोहिम राबवून बालाजीनगरमधून अभिषेक सचिन गायकवाडला अटक केली. या अभिषेक गायकवाडविरूद्ध भारतीय हत्यार कायद्याचा गुन्हा सुद्धा बीड येथे प्रलंबित आहे.