नांदेड,(प्रतिनिधी)- काल पर्यंत एक दुसऱ्यासाठी जीव देण्याची तयारी दाखवणारे आज एक दुसऱ्याविरुद्ध बोलायला लागले आहेत.नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांना शिविगाळ केल्याच्या कारणावरून नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख अश्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नारायण देवराव कदम रा.खडकी पोस्ट मरळक ता.जि. नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आयटीआय चौकात नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि शिवसेना संपर्क प्रमुख प्रकाश मरावार यांनी नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांना शिविगाळ केली. तसेच मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत शिवसैनिकांमध्ये द्वेश भावना निर्माण करुन सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे प्रयत्न करुन एखादा अपराध घडावा या उद्देशाने चिथावणी दिली.
शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 292/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 504,505, (1)(ब),505(1)(क),502(2) प्रमाणे दाखल केला आहे.शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डाँ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक देवकत्ते यांना तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राजकरणात आता नवनविन वळणे पाहायला मिळणार आहेत. यातीलच हा प्रकार आहे. शिवसेना विरुध्द शिवसेना अशी लढत आता होणार आहे.पुढे तरी मतदारांनी आपले अमुल्य मत वापरतांना स्वतःचे डोके जरुर वापरावे आसे नक्कीच म्हणायचे आहे.