प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने हर घर तिरंगा ऊपकम अंतर्गत सिडको वृत्तपत्र विक्रेते यांना ध्वज वाटप

नविन नांदेड(प्रतिनिधी)-हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने देण्यात आलेले तिरंगा ध्वज सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते यांच्या निवासस्थानी लावण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड यांच्या ऊपसिथीत वाटप करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या वतीने , प्रादेशिक परिवहन अधिकारी कामत, ऊप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी हर घर ऊपकम अंतर्गत वृत्तपत्र विक्रेते यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करण्यासाठी तिंरगा ध्वज वाटप केले होते, या ऊपकमा अंतर्गत सिडको वृत्तपत्र टिनशेड येथे दि. ६ आगस्ट रोजी सकाळी ७ वाजता नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, माजी नगरसेवक गायकवाड, संजय चाकुरकर, पत्रकार दिंगाबर शिंदे यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेते यांना देण्यात आले.

यावेळी लोकमत वितरणचे संजयकुमार गायकवाड,सुधाकर काकडे,वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे जेष्ठ विक्रेते शेख सयोधदीन, मदनसिंह चव्हाण,महिला वितरक वंदना लोणे, बालाजी सुताडे, राजु चव्हाण,अनिल धंवडे, गणेश कांबळे, गणेश ठाकूर, यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *