नांदेड (प्रतिनिधी)- 1 ऑगस्ट रोजी सुद्धा भीमघाट परिसरात झालेल्या भांडणाप्रकरणी दहा जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून ऑटोचा काच फोडला होता. हा गुन्हा सुद्धा 4 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील पहिले नाव मोहित उर्फ चिक्कू रमेश गोडबोले यांचेच आहे.
दि. 4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री प्रविण किशन हनमंते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास चिक्कू उर्फ मोहित रमेश गोडबोले, तेजा ठाकूर, प्रथमेश गोडबोले, रोहन नवघडे, सचिन नवघडे, मोनु, मंगेश नवघडे, हाटकर, विठ्ठल दुधमल, अजय गौतम थोरात या सर्वांनी मिळून तलवारी, हॉकी स्टीकच्या सहाय्याने दशहत निर्माण करत हातात पिस्टल निर्माण करत गल्लीतून जात असताना त्यांच्या ऑटोचे काच फोडून 20 हजार रूपयांचे नुकसान केले आहे. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 268/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, 427 आणि भारतीय हत्या कायद्याच्या कलम 3/25, 4/25 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे करीत आहेत.