
नांदेड (प्रतिनिधी)-सिकलीगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून राष्ट्रीय सिख सिकलीगर समाजाचे ग्यानी तेजासिंघ बावरी यांनी विविध मागण्या त्यांच्यासमोर सादर केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर या बाबत आम्ही निर्णय घेवू असे आश्वासन दिले.
ठाणे मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर सिकलीगर समाजाच्यावतीने ग्यानी तेजासिंघ बावरी, ठाणे गुरूद्वाराचे प्रमुख सरदार गुरमुखसिंघ, जसपालसिंघ लांगरी नांदेड, बलबिरसिंघ शेटी मुंबई, मनजितसिंघ ठाणे, सुखबिरसिंघ मुंबई, तरसेमसिंघ मुंबई यांच्यासह अनेक समाज बंधूंनी त्यांना शिरेपाव, तलवार भेट देवून त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी सिकलीगर समाजासाठी महाराष्ट्राच्या 36 जिल्हयांमध्ये 10 लाख रुपये कर्ज मिळावे. ज्यांच्याकडे रोजगार नाही त्यांना रोजगार मिळावा. मुलांच्या शिक्षणाची सोयव्हावी, ज्या लोकांकडे जमीन आहे त्यांना आवास योजनेची सेवा उपलब्ध करून द्यावी, ज्यांकडे जमीन नाही त्यांना जमीन उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचे एक निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आश्र्वास दिले आहे की, मंत्रीमंडळाची बैठक होईल तेंव्हा या प्रस्तावांवर विचार करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तेजासिंघ बावरी, बल्लूसिंघ बावरी आदींनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे.