नांदेड,(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेने मुख्यमंत्री येणार या गर्दीत आपला डाव साधण्यासाठी आलेल्या दोन मोबाईल चोरट्यांचा सुगावा लावला आणि त्यांना गजाआड केले आहे.
८ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडला आले होते.त्यांचा एक कार्यक्रम भक्ती लॉन्स येथे होता.तेथे मोट्ठी गर्दी होती.पोलीस प्रमुख प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वात असंख्य पोलीस बळ कार्यरत होते.त्या गर्दीत आपला डाव साधण्यासाठी आलेल्या दोन मोबाईल चोरट्यांचा सुगावा नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात कार्यरत पथकाने लावलाच.त्यांना अत्यंत विश्वासात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले दोन मोबाईल किंमत २९ हजार रुपयांचे जप्त केले आहेत.स्थागुशा पथकाच्या कामगिरीने भाग्यनगर पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा क्रमांक २७५/२०२२ उघडकीस आला आहे.
या पोलीस पथकात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने,पोलीस उप निरीक्षक गोविंद मुंडे,पोलीस अंमलदार घुगे,संजीव जिंकालवाड,गंगाधर कदम,विलास कदममगणेश धुमाळ,शिंदे यांचा समावेश होता.
पोलीस निरीक्षकांच्या ‘लकी’ शर्ट

पकडलेल्या मोबाईल चोरट्यांसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आपल्या सर्व टीमचा फोटो कडून प्रसिद्धीसाठी पाठवला आहे.या छायाचित्रामधील खास बाब अशी आहे की स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी परिधान केलेला शर्ट पहिला असता,हा विशेष शर्ट त्यांनी फोटो काढतांना परिधान केल्याचे दिसते.बहुदा हा शर्ट त्यांच्यासाठी “लकी” सारत असेल.