ऍटोत विसरेली 39 हजार रुपये ऐवजाची बॅग परत केली

नांदेड(प्रतिनिधी)-एका ऍटोमध्ये विसरलेली बॅग रात्री 11 वाजता मालकाच्या घरी जावून टायगर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष व रिक्षा चालकाने परत केली. या बॅगमध्ये 39 हजार रुपयांचा ऐवज होता.
प्राप्त माहितीनुसार 11 ऑगस्ट रोजी 4 वाजता प्रकाश चेनूरकर अण्णा यांची मुलगी आणि इतर कुटूंबिय रेल्वेने नांदेडला आले आणि त्यांनी रेल्वे स्थानकातून एक ऍटो ठरवून महाराणा प्रताप चौकापर्यंत आपला प्रवास पुर्ण केला. ऍटो रिक्षातून उतरून घरी गेल्यानंतर प्रकाश चेनूरकरच्या मुलीला आठवले की, माझी बॅग ऍटो रिक्षात राहिली.
याबाबत प्रकाश चेनूरकर यांनी टायगर ऍटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद बाबा यांना फोन करून माहिती घेण्यास सांगितले. सायंकाळी 7 वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा ऍटो रिक्षा क्रमांक एम.एच.26 बी.डी.3853 असल्याचे दिसले. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला आणि त्या ऍटोचा चालक विजेंद्र पांडूरंग आवटे रा.जनता कॉलनी याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर ऍटो रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी ऍटो चालकाला सोबत नेऊन प्रकाश चेनूरकर यांच्या मुलीने ऍटो रिक्षात विसलेली बॅग परत केली. या बॅगमध्ये छोट्या बाळाच्या हातील सोन्याचे गंठण 30 हजार रुपये किंमतीचे दोन चैन जोड्या 6 हजार रुपये किंमतीच्या आणि रोख रक्कम 3 हजार असा 39 हजारांचा ऐवज होता. त्यानंतर बॅग मिळाल्याचा आनंद झाल्याने एक हजार रुपये रोख देवून प्रकाश चेनूरकर यांनी ऍटो चालक विजेंद्र आवटेचा सत्कार केला आणि रिक्षा चालक संघटनेचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *