नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने श्रीकृष्णाचा आवाज दाबण्यात गेला अशा मथळ्याची बातमी प्रसिध्द केल्यानंतर बेघर पत्रकारांचा विषय वगळून महानगर पालिका प्रशासनाने श्रीकृष्ण निळकंठराव झाकडे यांना 15 ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई येथे आपण करणारे धरणे आंदोलन थांबवावे असे पत्र पाठवले आहे.
दि.10 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण निळकंठराव झाकडे यांनी नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राच्या आधारे वास्तव न्युज लाईव्हने बेघर पत्रकारांचा विषय घेवून श्रीकृष्ण झाकडे यांच्या इतर समस्या मांडणारे वृत्त प्रकाशीत केले होते. वास्तव न्युज लाईव्हचे वृत्त प्रकाशीत होताच दि.12 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त-2 यांनी स्वाक्षरी केलेले पत्र प्राप्त झाले. या पत्राचा जावक क्रमांक 6633 असा आहे.
या पत्रात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील उच्च अधिकारी आणि कर्मचारी यांनी पदाचा, अधिकारांचा दुरपयोग करून पिडीत व अन्याय व भ्रष्टाचार बाबत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू करणेबाबत असा लिहिलेला आहे. या पत्रात 5 संदर्भ जोडण्यात आलेले आहेत. त्यांच्या तारखा जून आणि ऑगस्ट महिन्यातील शेवटचा पत्र संदर्भ दि.7 ऑगस्ट 2022 चा लिहिला आहे. इतर सर्व संदर्भ यापुर्वीचे आहेत. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी वास्तव न्युज लाईव्हने श्रीकृष्ण झाकडे यांच्या पत्राच्या आधारे बेघर पत्रकारांना वाचविण्याचा मुद्दा मथळा करून ते पत्र वृत्ताच्या रुपात प्रकाशित केले होते.
महानगरपालिकेच्यावतीने श्रीकृष्ण झाकडे यांना देण्यात आलेल्या पत्रात बेघर पत्रकारांचा भुखंड घोटाहा वगळण्यात आला आहे. त्यांच्या इतर मागण्यांबद्दल माहिती लिहुन आपली सर्व कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे आपण 15 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2022/08/10/बेघर-पत्रकारांच्या-भुखं-2/