नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात पाळज गावात असलेल्या प्राचीन गणेश मंदीरात एक लागडी श्री गणेशमूर्ती आहे. पाळज येथील हे मंदिर भाद्रपद चतुर्थी ते चतुदर्शी या दिवसांसाठीच उघडे राहते बाकी वर्षभर मंदिर बंद राहते. या मुर्तीला नांदेड येथील मूर्तीकार किशनसिंह ठाकूर दरवर्षी पाळज येथे जावून रंगरंगोटी करतात. या वर्षी पाळज येथील लाकडी खुर्चीवर बसलेली श्रीगणेशाची लाकडी गणेशमुर्तीला रंगरंगोटी करून दिली. पाळज येथील गणेशमुर्ती नांदेडला रंगरंगोटीसाठी आली आहे हे माहित झाल्याने नांदेड येथील असंख्य गणेशभक्तांनी पाळजच्या गणेशमुर्तीचे गाडीपूरा भागात जावून दर्शन घेतले.
