
नांदेड (प्रतिनिधी)-सद्भावना दिवस निमीत्ताने नांदेड पोलीस दलातर्फे आज गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली शपथ घेण्यात आली.
यावेळी स्थानिक गुन्हा पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी शपथेच सामुहीक वाचन केले. या कार्याक्रमास पोलीस अधिक्षक कार्यालय येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सपोउपनि सुर्यभान कागणे, संजय सांगवीकर यांनी उत्तम रित्या केले.
