नांदेड(प्रतिनिधी)-5 हजार रुपये लाच मागून त्यातील 3 हजार 500 रुपये अगोदर घेवून आज 1 हजार 500 रुपये लाच स्विकारणाऱ्या बिलोली नगर परिषदेतील वरिष्ठ लिपीकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
नगर परिषदेतीलच एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यात जमा करण्यासाठी महिला वरिष्ठ लिपीक सौ.कमल पिराजी तुमडे (47) यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली अशी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 17 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली. 18 ऑगस्ट रोजी लाच मागणीची पडताळणी झाली. 5 हजारांच्या लाचेतील 3 हजार 500 रुपये तक्रार देण्यापुर्वीच तक्रारदाराने सौ.कमल तुमडे यांच्या खात्यावर जमा केली हेाती आणि आज 1 हजार 500 रुपयांची लाच स्विकारतांना सौ.कमल तुमडेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
ही सर्व प्रक्रिया पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धर्मसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक नानासाहेब कदम, शेषराव नितनवरे, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अनंतवार, ईश्र्वर जाधव, शेख मुजीब आणि मेनका पवार यांनी पार पाडली.वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक निरिक्षक नानासाहेब कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.
3 हजार 500 रुपयांची लाच स्वत:च्या बॅंक खात्यात आणि 1500 रुपये प्रत्यक्ष स्विकारतांना महिला वरिष्ठ लिपीक गजाआड