नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर पोलीस चौकीच्या आसपास असणाऱ्या देशी दारु विक्रीमुळे या भागात नेहमी दशहतच असते. या भागातून जाणाऱ्या नागरीकांना अनेकदा त्रास होतो. तरी पण या अवैध दारु विक्रीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही.
गणेशनगर पोलीस चौकीच्या आसपास दारु विक्री होत असते. दारु दुकानांच्या नियमावली व्यतिरिक्त या ठिकाणी होणारी दारु विक्री त्रासदायक आहे. ज्या ठिकाणी दारु विक्री होते. त्याच्या आसपास तीन शाळा आहेत. अनेक शिकवण्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ सुध्दा या भागात भरपूर आहे. या भागाच्या आसपास उच्चभु्र वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये जाण्यासाठी दारु विक्रीच्या ठिकाणापासून रस्ताच एक पर्याय आहे. या ठिकाणी दारुच्या नशेत अनेक गुन्हे घडतात. सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी दारु विक्री सुरू होते. त्यामुळे पहाटे न्याहारी करण्याच्यावेळेत लोक मद्यप्राशन करतात आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो. तरी पण या दारु विक्रीवर बंदी येत नाही. या भागातून जाणाऱ्या-येणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना, महिलांना आणि विद्यार्थींनींना होणारा त्रास कोणीच वाचवत नाही.
एखाद्या खाजगी व्यक्तीने या प्रकरणांमध्ये हात घातला तर त्याला तुझ्या बापाचा रस्ता आहे काय, तुला काय करायचे आहे असे प्रश्न विचारले जातात. दारु पिणाऱ्यांची संख्या जास्त, त्यांना संरक्षण देणारे जास्त त्यामुळे कोणीही सर्वसामान्य माणुस या भागात कोणत्याच लफड्यात जाण्याची हिंमत दाखवत नाही. कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न नेहमी कायम आहे. या बातमीच्या मथळ्यात खलक हा शब्द वापरला आहे. हा शब्द समजून घेण्यासाठी प्रसिध्द ईतिहासकार सेतु माधवराव पगडी यांचे लिखाण वाचायला हवे. तरीपण आम्ही वाचकांच्या माहितीसाठी खलक या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य नागरीक असतो हे लिहित आहे.
गणेशनगर पोलीस चौकीच्या आसपास विक्री होणाऱ्या अवैध दारुमुळे ‘खलक’ त्रासला