धनुर्धारी सृष्टी पाटीलने घेतली उंच भरारी

नांदेड(प्रतिनिधी)-दक्षिण कोरिया येथे आयोजित भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरासाठी सोनीपत हरियाणा येथे दिनांक 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित निवड चाचणी प्रक्रियेत नांदेडची सुवर्णकन्या मराठवाडा एक्सप्रेस कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंडची अप्रतिम भरारी,अतिशय लहान वयापासून ऑलिंपिकचे ध्येय उराशी बाळगत “होय मला ऑलम्पिक मध्ये देशासाठी पदक मिळवायचा ” असा चंग बांधलेली सृष्टी ज्युनिअर वयोगटात आपली भारतीय संघात निवड कायम केली. या चाचणीत देशभरात 2551 गुण मिळवीत तिसरी तर एलिमिनेशन राउंड मध्ये दब दबा कायम ठेवीत राऊंड रॉबिनमध्येही आपले तिसरे स्थान कायम ठेवत ऑक्टोबर मध्ये दक्षिण कोरिया येथे आयोजित कॅम्प साठी आपली निवड कायम केली. कायमच क्रीडा क्षेत्रात सर्व परिचित सृष्टीला नांदेडकरांनी भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला. जागतिक धनुर्विद्या स्पर्धा ,एशियन गेम ,तसेच 2024 मधील ऑलम्पिक चे ध्येय नजरेसमोर ठेवून पुढे प्रवास करणाऱ्या नांदेडच्या सुवर्णकन्येला आजपर्यंत नांदेडकरांनी, महाराष्ट्रातील लोकांनी दिलेले प्रेम व आशीर्वादाच्या जोरावरच तिची कारकीर्द देशासाठी अशीच बहरू दे त्यासाठी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *