नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला एक जबरी चोरीचा प्रकार शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला. पाच युवकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 12 हजार 300 रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच एका 27 वर्षीय युवकाला पकडून शिवाजीनगर पोलीसांनी त्याच्याकडून धार-धार हत्यार जप्त केले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2022 रोजी अण्णाभाऊ साठे चौक उड्डाणपुलाखाली काही अनोळखी लोकांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील एक मोबाईल आणि रोख रक्कम असा 5 हजार 500 रुपयांचा लुटला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 290/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394,34 नुसार दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी शोधतांना शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उदय उर्फ लड्या भगवान हातांगळे (24) याच्याकडे या बाबत विचारणा केली असता त्याने व इतर साथीदारांनी मिळून हा गुन्हा केला होता ही बाब उघड झाली. त्याचे साथीदार विशाल कैलास खिल्लारे (21), सुरज रामकिशन घेणे (19) अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (21) किर्तीपाल भिमराव आढाव (20) हे होते. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने 6 सप्टेंबर रोजी दररोजचे काम करत असतांना त्यांना सुनिल सटवाजी जाधव (27) रा.राजनगर नांदेड हा आपल्या हातात खंजीर बाळगून फिरतांना सापडला पोलीसांनी त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी केलेल्या कामगिरीसाठी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड. रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे, विशाल अटकोरे आदींचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी एक जबरी चोरीचा गुन्हा उघड करत पाच युवकांना ताब्यात घेतले