मनाठा(प्रतिनिधी)-मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाभरा गावात गणेश विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
चाभरा ता.अर्धापूर येथील बालाजी दिगंबर काकडे (35) हे आपल्या घरासमोर असलेल्या टीनशेडच्या ओसरीत झोपले होते. एकीकडे गणेश विसर्जनाची धामधुम संपली होती. गावात शांतात होती. मध्यरात्रीच्या सुमारास कोणी तरी अज्ञात माणसाने त्यांच्या मानेवर झोपलेल्या अवस्थेत कुऱ्हाडीने हल्ला केला. प्रत्यक्ष घटनास्थळी पाहिले असता कुऱ्हाडीने पाच ते सहा वेळेस मारल्याच्या जखमा दिसत आहेत. त्वरीत प्रभावाने बालाजी काकडे यांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतू दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. चाभरा हे गाव मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. याबाबत मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
चाभरा येथे 35 वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून