
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्यवतिने नांदेड शहरातील बि.के.फंक्शन सभाग्रह येथे आम आदमी पार्टीच्या नांदेडची आढावा बैठक व विविध पक्षातील सक्रीय कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याच्या आध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष रंगा दादा राचुरे हे होते.
या सोहळ्यास मार्गदर्शन करतांना रंगादादा राचुरे म्हणाले की,सध्या आपल्या देशाची सत्ता ही धर्माच्या नावावर स्थापित होवुन,भांडवलदाराचे चांगभले करत आहे एकीकडे हिंदुराष्ट्र बनवण्याचे अमीष दाखवुन देशाला महागाईच्या आगित लोटल्या जात आहे.व भारतीय समाजाची व संविधानाची पायमल्ली होतांना दिसत आहे. आपल्याला भारतीय संविधानातील खरा राष्ट्रवाद जनमाणसात राबवयाचा/आत्मसात करायचा असेल तर जनतेने काळाची गरज ओळखुन आम आदमी पार्टी ला साथ द्या असे आवाहन ही त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला छ.शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस मान्यवर रंगादादा राचुरे,धनंजय शिंदे,मा.खा.हरिभाऊ राठोड,धनराज वंजारी,नरेन्द्रसिंघ ग्रंथी,विजय राठोड,अनिल ढवळे,सुग्रीव मुंडे,ज्ञानेश्वर कदम,डॉ.अवधुत पवार,ऍड..जगजीवन भेदे यांच्या हास्ते पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कदम पांगरीकर यांनी केले.तर
या कार्यक्रमास विषेश अतिथी आप नेते धनराज वंजारी,मा.खा.हरिभाऊ राठोड हे मुख्य आकर्षण ठरले.व त्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. व यावेळीं आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे, जेष्ठ नेते नरेंद्र सिंघ ग्रंथी,अनिल ढवळे,सुग्रीव मुंडे,यांनी कार्यक्रत्यांना पक्ष संघटन मजबुती बाबद सखोल मार्गदर्शन केले.या आढावा कार्यक्रमात,नांदेड जिल्हाच्या वतीने डॉ.अवधुत पवार,जिल्हा कोषाध्यक्ष संजीव जिंदाल यांच्या सह नांदेड शहर संयोजक/संघटक/नांदेड जिल्हातिल सर्व तालुका संयोजक यांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.या कार्यक्रमाचे औचित्य साधुन आम आदमी पार्टी मध्ये विविध पक्षातील नेते व कार्यक्रते यांना नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभा प्रमुख ऍड.. जगजीवन भेदे यांनी जाहीर केलेल्या यादी नुसार अदील जहागिरदार,ऍड..अनुप आगाशे,ऍड..ए.एस.मांजरमकर,मांगीलाल राठोड, निहाल कांचवाले,अदिल सिंग,रज्जुभाई यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यक्रत्यांनी प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड..रितेश पाडमुख यांनी केले तर आभार ऍड..रामदास शेरे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्विते साठी युवा आम आदमी चे विशाल जोगदंड,जयेश चंदेल,विशाल मोरे, भारतश्री.गिते सुर्यवंशी, यांनी विषेश षरिश्रम घेतले.