नांदेड(प्रतिनिधी)-लोकांना तथाकथीत म्हणणाऱ्या शेख याहिया शेख इसाकला नांदेड तहसीलदारांनी दिलेल्या नोटीसचे काय झाले? खुलासा दिला होता की, नाही, नाही दिला तरी त्यावर जवळपास दोन वर्ष झाले त्यावर कारवाई का झाली नाही हा प्रश्न नव्याने समारे आला आहे.
इतर लोकांनाबद्दल आपल्याकडे काही पुरावे नसतांना बातम्यांचा धंदा युट्युबच्या माध्यमातून करणाऱ्या शेख याहिया शेख इसाकने माझा महाराष्ट्र लाईव्ह या नावाचे युट्यूब चॅनल सुरू केले. त्या आधारावर आपल्या घशात इतरांचे तुप टाकण्याची वृत्ती बळावली आणि या वृत्तीतूनच अशा अनेक बातम्या लिहिल्या ज्याच्याबद्दल काही एक पुरावा, वस्तुनिष्ठता उपलब्ध नाही.
युट्युब चॅनल बाबत उपसंचालक (माहिती) कोकण विभाग,नवी मुंबई डॉ.गणेश मुळे यांनी 4 मे 2020 रोजी एक पत्र पारीत केले होते. ज्याचा जावक क्रमांक 1293/2020 असा आहे. या पत्राआधारे बहुसंख्य युट्युब चॅनल विविध बातम्या, यश कथा दाखवतात. या चॅनलचे विविध प्रतिनिधी जिल्हा माहिती कार्यालयाकडे पत्रकारांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची मागणी करीत असतात. या संदर्भात माहिती संचालक यांच्यासोबत झालेल्या ई मिटींगमध्ये असे ठरलेले आहे की, युट्यूब चॅनलची कोणतीही नोंदणी होत नसल्याने ती अधिकृत समजण्यात येवू नये आणि या बाबत उपसंचालक कार्यालयाला पुन्हा माहिती विचारण्यात येवू नये हे पत्र म्हणजेच युट्यूब चॅनल म्हणजे बोगस पणा आहे हेच दाखवते.
माझा महाराष्ट्र लाईव्हने 27 जुलै 2020 रोजी युट्युब वेबसाईटवर माझा महाराष्ट्र लाईव्हच्या तथाकथीत पत्रकाराने पोलीस ठाणे इतवारा येथे पकडलेल्या धान्याच्या बाबतीची बातमी देतांना मानहाणीकारक आणि प्रशासनाची प्रतिमा मल्लीन केली आहे अशा वक्तव्यामुळे महसुल अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तवीक कुठलाही पुरावा नसतांना आणि वस्तुनिष्ठता न तपासता अत्यंत बेजबाबदारपणे तथाकथीत चॅनलवर बातमी प्रसिध्द करून प्रतिमा मल्लीन केली आहे. केवळ वैयक्तीक प्रसिध्दीसाठी हे वृत्त प्रकाशीत करून महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी केली आहे. कोविड कालखंडात अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे वृत्त कोणत्या पुराव्याच्या आधारावर केले याचा खुलासा 24 तासाच्या आत करावा. खुलासा पुराव्यांसह विहित मुदतीत सादर न केल्यास किंवा पुरावा समाधानकारक वाटला नाही तर आपल्याविरुध्द छपाई आणि पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 मधील कलम 14 आणि 15 तसेच भारतीय संविधानातील कलम 465, 479, 500 आणि 501 नुसार कार्यवाही केली जाईल याची नोंद घेण्याचे समजपत्र माझा महाराष्ट्र लाईव्हच्या तथाकथीत पत्रकाराला अर्थात शेख याहिया शेख इसाकला तालुकादंडाधिकारी तथा तहसीलदार नांदेड यांनी 28 जुलै 2020 रोजी जारी केले होते.
शासकीय पत्रामध्ये ज्याचे नाव तथाकथीत आले आहे. त्याने इतरांना तथाकथीत म्हणावे यापेक्षा दुर्देव ते काय. ज्याच्या बद्दल तथाकथीत हा शब्द वापरला त्याच्या मागे किती दिवस फिरला होतास. किती लफड्यांमधून त्याने वाचवले होते याची आठवण ठेवा हे सांगण्यासाठीच हा शब्द प्रपंच.
शेख याहिया शेख इसाक हाच तथाकथीत पत्रकार; शासकीय दस्तऐवजात आहे नोंद