नांदेड(प्रतिनिधी)-महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय साहेबांचा आहे असे सांगून काही नगरसेवकांनी सभा संपविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा कॉंगे्रसचेच नगरसेवक एक दुसऱ्याशी भिडले होते. पण साहेब कोण ? या बाबत कोणीही काहीही बोले नाही. बेकायदेशीर कामे करण्यासाठी राष्ट्रगिताचा गैरउपयोग केला जातो असा आरोप नगरसेवक फारुख यांनी केला अशा प्रकारे 14 पैकी 13 विषय पास-पास म्हणत एक विषय क्रमांक 8 स्थगित ठेवण्यात आला आणि मनपाची सर्वसाधारण सभा संपली.
महानगरपालिका सभागृहात आज सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री पावडे सोबत उपमहापौर अब्दुल गफार, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू व्यासपीठावर उपस्थित होते.
सभा सुरू होताच बिओटी तत्वावरील कामाबाबत बोलतांना नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला.फुले मंगल कार्यालयातून बहुउद्देशीय सभागृह कसे गायब झाले असा प्रश्न विचारून नगरसेवक बापूराव गजभारे यांनी बिओटी स्थगिती निर्णयाचे स्वागत करतो असे सांगितले. अब्दुल सत्तार म्हणाले की, बिओटी हा महानगरपालिकेचा अधिकार आहे. किशोर स्वामी म्हणाले काम थांबवू नका चौकशी करा. ऍड. महेश कनकदंडे म्हणाले की, पंतप्रधानांनी बिओटी तत्वावर भोपाळचे रेल्वे स्थानक बांधले मग नांदेडच्या बिओटीला विरोध का. याप्रसंगी बापूराव गजभारे म्हणाले की, बिओटी तत्वावरील जागा जेथे जागतिक दर्जाचे साहित्य दालन, संस्कृतीक सभागृह व शॉपींग कॉम्प्लेक्स बांधा. बांधकाम विभागाने 50 कोटीची कामे परत केली आहेत.
याप्रसंगी शहरातील पथदिवे बंद, घंटागाडी नगरसेवकाने फोन केल्याशिवाय येत नाही, मल्लनिसार वाहिणीच्या समस्या आदी विषयांवर भरपूर चर्चा झाली. यावेळी किशोर स्वामी म्हणाले अशोकरावांनी आधी 2 हजार कोटी आणले, आता हजार कोटी आणले. नागरीकांना आवाहन करून बांधकाम विभागाचे रस्ते सांगावे. 150 कोटी वर्ग केल्यानंतर स्थगिती दिली त्यासाठी ठराव घेवून स्थगिती उठविण्याचा निर्णय घ्यावा. अनाधिकृत बांधलेल्या गेटला आयुक्त संरक्षण कसे देतात. जमीनीवर अनाधिकृत कब्जा देणारे तुम्हीच पहिले आयुक्त आहेत असे नगरसेवकांनी सांगितल्यावर आयुक्त म्हणाले की, सोसायटीने इतरांच्या प्रवेशासाठी जागा ठेवली की, नाही हे तपासावे लागले. संरक्षण भिंती किंवा दरवाजा लावता येते. आपल्या कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नगरसेवक वारंवार व्यासपीठाजवळ जावून हातवारे करून, डोक्यावर हात मारून निषेध व्यक्त करत होते. नगरसेवक बदवेल म्हणाले की, महानगरपालिकेने सुरू केलेले प्रकल्प बंद पडले आहेत. साहेब का विषय हे बोलकर हमको चुप कराते. यावेळी नगरसेवक रशिद म्हणाले की, दादागिरी करून ठराव मंजुर करत असाल तर आमचीही ताकत आहे.
नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी श्री गणेश विसर्जनात श्री गणेश मुर्तींची विटंबना मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केली असा आक्षेप उचलला. मी व्हिडीओ क्लिप पाठवली आहे या कार्यवाही केली ते सांगा. यावर आयुक्तांनी सर्वांच्या इच्छेचा सन्मान राखला. धर्माचे राजकारण करू नका योग्य सन्मान राखला जाईल असे महापौर जयश्री पावडे म्हणाल्या. यावर्षी श्री गणेश मुर्तींची संख्या जास्त होती, आकार मोठे होते नदीपात्रात विसर्जन शक्य नाही आणि अपेक्षीत नाही असे उत्तर दिले. विषय क्रमांक 8 मध्ये गुंठेवारी हा विषय होता. तो विषय सोडून शेवटी सर्व विषय पास -पास असे म्हणत पास करण्यात आले. तुमची बेकायदेशीर कामे करण्यासाठी राष्ट्रगिताचा दुरपयोग केला जातो असा आरोप नगरसेवक फारुख यांनी केला. विषय पत्रिका सुरू होण्याआधीच राष्ट्रगित कसे सुरू केले जाते असा प्रश्न फारुख यांनी विचारल्यावर महापौरांनी सांगितले की, तुम्ही तर आमचे ऐकतच नाहीत.
मनपाला कंत्राटदाराच्या 14 पिढ्यांचे भले करायचे आहे
महानगरपालिकेने जनता मार्केटची जागा बिओटी तत्वावर 1 कोटी रुपयांमध्ये दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. आजच्या परिस्थितीत या जागेची किंमत सेंटीमिटरच्या हिशोबाने अब्जावधी रुपये आहे. इथे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदार कर्ज घेतो. तेंव्हा महानगरपालिकाच त्याची जामीन देते. याचा अर्थ असा आहे की, या कंत्राटदाराच्या सात पिढ्यांचे भले मनपाने अगोदरच केले आहे. आता मनपाने या कंत्राटदारांच्या 14 पिढ्यांचे भले करण्याचा चंग बांधलेला दिसतो आणि त्यासाठी कोणताही नगरसेवक याबद्दल जोरदार आक्षेप घेत नाही. ही दुर्देवाची बाब आहे.