नांदेड, (प्रतिनिधी)- बेरोजगार उमेदवार / युवक-युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्यावतीने गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. शेप स्किल अकॅडमी, नृसिंह मंदिराजवळ कौठा रोड, कौठा, नांदेड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे लेखापरिक्षक बालाजी जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनीं या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.
Related Posts
हिमायतनगर नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
नांदेड ()- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग…
स्थानिक गुन्हा शाखेने तीन बकरी चोर पकडले; दोन लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-बकऱ्या चोरून चार चाकी गाडीत घेवून जाणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. त्यांनी केलेल्या तीन…
महासंस्कृती महोत्सवात तिसऱ्या दिवशी नृत्य -नाट्यांचा जल्लोष
• शिवजयंतीच्या विविधांगी आयोजनाने आज होणार समारोप • ‘जल्लोष ‘ मध्ये लुप्त होत चाललेल्या कलांचा स्थानिक कलाकारांकडून आविष्कार नांदेड (जिमाका) …