नांदेड,(प्रतिनिधी)- अत्यंत कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक असलेल्या नदी पलीकडील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका ४३ वर्षीय माणसाच्या पोटाचं चाकू खुपसून त्यांच्याकडील १२ हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेड शहरातून लातूर कडे जाणाऱ्या लातूर फाटा येथे गणेश उमाजी राठोड (४३) रा.घोडस तांडा ता.कंधार हे व्यक्ती उभे असतांना काही दरोडेखोर आले. त्यांनी गणेश राठोड यांच्या पोटात समोरच्या बाजूने चाकू खुपसला आणि त्यांच्या कडील रोख रक्कम १२ हजार रुपये आणि एक मोबाईल असा ऐवज लुटून नेला आहे.हा प्रकार १५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री ००/३० वाजता घडला. सध्या गणेश राठोड यांच्यावर सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुर आहेत.या संदर्भाने काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली या बाबत माहिती प्राप्त झाली नाही.पण अत्यंत कडक शिस्तीच्या आणि कायद्या पेक्षा दाउद इब्राहिम काय आणि अजून कोणी असेना का तो सुद्धा मोठा नाही असा उच्च विचार असणाऱ्या पोलीस निरीक्षकांच्या हद्दीत दरोडेखोरांनी दाखवलेली हिम्मत आता दरोडेखोरांना महागात पडणारच असे लिहिले तर चूक ठरणार नाही.