नांदेड(प्रतिनिधी)-एका संस्था चालकाच्या शाळेविरुध्द तक्रार करणाऱ्या चार जणांनी खंडणी मागितली होती. त्यातील एकाला दहा हजारांची खंडणी घेतांना भाग्यनगर पोलीसांनी रंगेहात पकडले. इतर तिघांचा भाग्यनगर पोलीस शोध घेत आहेत.
बालाजी मरिबा पेनूरकर यांची लोहा येथे प्रायमरी इंग्लीश शाळा आहे. त्यांच्या शाळेविरुध्द नामदेव पुंडलिक थेटे रा.धावरी ता.लोहा सध्या सिडको नांदेड, स्वाती सोनकांबळे रा.हडको नांदेड, पांडूरंग आर.नांदेडकर आणि नितीन गवारे रा.तरोडा या चौघांनी त्यांच्या लोहा येथील शाळेविरुध्द तक्रार केली आहे. ती तक्रार मिटवून घेण्यासाठी दहा हजार रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी दहा हजारांची लाच स्विकारणाऱ्या नामदेव पुंडलिक थेटेला रंगेहात पकडले आणि खंडणीचे दहा हजार रुपये जप्त केले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 34 नुसार गुन्हा क्रमांक 317/2022 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुढील तपास रावसाहेब जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर तिन खंडणीखोरांचा भाग्यनगर पोलीस शोध घेत आहेत.
शाळेबद्दल तक्रार करून चार जणांनी मागितली खंडणी; एकाला रंगेहात पकडले