नांदेड(प्रतिनिधी)-सन2020 मध्ये गाडेगाव रस्त्यावरील मुजाहिद चौक येथे झालेल्या भांडण प्रकरणात तब्बल अडीच वर्षानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 22 जणांविरुध्द जीवघेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल झाला आहे.
सन 2020 मध्ये 23 मार्च रोजी मुजाहिद चौक येथे मोठा राडा झाला होता. त्यात खून झाला. काही जखमी झाले. या प्रकरणातील मोहम्मद गौस मोहियोद्दीन मोहम्मद हाफीजोद्दीन फारुखी इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या दिवशी 22 जणांनी त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी तलवार, खंजर, काठ्या, नॉनचॅक, लोखंडी रॉड, क्रिकेट बॅट, स्टॅंप, फाड्याचा दांडा, दुचाकीची शॉकऍप अशा हत्यारांचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत दवाखान्यात सुध्दा त्यांच्यावर उपचार झाला. पोलीसांनी दखल घेतली नाही म्हणून मोहम्मद गौस इनामदार यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. सहाव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वंदना उखाडे यांनी इतर किरकोळ अर्ज क्रमांक 572/2021 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात पुढील 22 जणांची नावे आहेत. मोहम्मद अली गुटखावाला अब्दुल रहिम, मोहम्मद जुनेद अब्दुल रहिम, मोहम्मद नजीब सरफराजोद्दीन, मोहम्मद जफर सरफराजोद्दीन, सुलतानोद्दीन उर्फ अकबर सरफराजोद्दीन, शेख सिकंदर शेख जाफर, मुजफरोद्दीन उर्फ शमीम जहुरोद्दीन, गुफरानोद्दीन गयासोद्दीन इफतेखारोद्दीन उर्फ अतिक अहमोद्दीन, अखतर काझी मुबशीर काझी मोहम्मद हाजी रहिमोद्दीन, मोहम्मद जहांगिर इफ्तेखारोद्दीन, अथर काझी खादर काझी, सना मोहमद्दी मोहम्मद जुनेद, मियॉ जानी बाबा मियॉ, जावीद जटर, अथर फारुखी खादर फारुखी, इकरामोद्दी सरफराजोद्दीन, मोहम्मद खाजा अब्दुल रहिम. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांच्याकडे देण्यात आला आहे.
2020 च्या घटनेचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला