नांदेड(प्रतिनिधी)-सातेगाव महादेव मंदिर ता.नायगाव येथे महादेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाली आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी घडली आहे.
अनुरथ बाबा जाधव हे सातेगाव महादेव मंदिर ता.नायगाव येथे पुजारी आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 सप्टेंबरच्या सायंकाळी 7 वाजेपासून 18 सप्टेंबरच्या पहाटे 6.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी मंदिराच्या चॅनेलगेटचे कुलूप तोडून आणि चॅनेल गेट वाकवून मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरात असलेल्या दानपेटीचे दोन्ही कुलूप तोडले आणि त्यातील 20 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कुमरे हे करीत आहेत.
गणपतराव शेषराव कल्याणकर हे 65 वर्षीय गृहस्थ 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता नांदेड ते वारंगा जाणाऱ्या रस्त्यावर अमृतनगर कमानीजवळ उभे असतांना मोटारसायकल क्रमांक एम.एच.29 ई.एल.6484 वर बसून दोन दरोडेखोर आले आणि त्यांनी त्यांच्या खिशातील 9 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरीण गुन्हा क्रमंाक 161/2022 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक शेख तय्यब अधिक तपास करीत आहेत.
सातेगाव महादेव मंदिराची दानपेटी फोडली