मनपा कर्मचारी पतसंस्था सभासदांना ५ लाख कर्ज देणार

 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद बांधवांना ५ लाख रुपये कर्ज देणार असुन आरोग्यदायी ऊपाचार योजना अंतर्गत २ लाख उपचारासाठी तर सभासद मुलीचा लग्नासाठी दोन लाख अतिरिक्त कर्ज यासह विविध विषयांचे ठराव मंजूर करून या सभेत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी,मनपा शाळे अंतर्गत असलेल्या मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकांना व सभासद पाल्याच्या सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड व ऊपसिथीत मान्यवरांच्या, संचालक मंडळ यांच्या ऊपसिथीत सत्कार करण्यात आला.

नावामनपा पतसंस्थेच्यी वार्षिक सर्वसाधारण सभा कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे १८ सप्टेंबर रोजी अध्यक्ष दयानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे, मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे,मुख्य लेखाधिकारी पक्वान्ने, लेखाधिकारी सौ.शोभा मुंडे,विधी अधिकारी अजित पाल संधु, माजी उपायुक्त विलास भोसिकर, सहाय्यक आयुक्त संजय जाधव ,कार्यकारी शहर अभियंता दिलीप आरसुळे, माजी सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे, जगदीश कुलकर्णी,व डॉ.ऊमेश कोळेकर, डॉ.पललेवाड, डॉ.सुरयकांत लोणीकर,व मान्यवरांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली.

प्रांरभी ऊपसिथीत मान्यवरांच्ये स्वागत संचालक मंडळ सभासद यांनी केले तर नावामनपा हद्दीतील असलेल्या मनपा शाळा वजीराबाद क्रंमाक १ व खयुम प्लाट क्रमांक ८ या शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल व मुख्याध्यापक एम.सी.कांबळे,शिक्षीका आशाताई घुले, आदर्श शिक्षक पि.टी.माहुरे,राजा पटेल यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल,सभासद गुणवंत विद्यार्थ्यांचा,सभासद सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या ऊपसिथीत पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह, गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सर्वसाधारण सभेत या पुर्वी सभासद बांधवांना ४ लक्ष रुपये कर्ज मर्यादा होती ती आता ५ लक्ष रुपये तर सभासद मुलीचा लग्नासाठी या पुर्वी २५ हजार रुपये कर्ज देण्यात येत होते ते आता २ लक्ष रुपये अतिरिक्त कर्ज तर सभासदांसाठी आरोग्य दायी उपचारासाठी दोन लक्ष रुपयांचा कर्ज निधी मंजूर सभेत मंजूर करण्यात आला आहे.

सभेत ऊपसिथीत मान्यवरांनी मार्गदर्शन करून संचालक मंडळ यांच्ये अभिनंदन केले तर सुत्रसंचलन आशा ताई घुले,श्रीमती सोनेपवार यांनी केले, वार्षिक अहवाल वाचन सचिव गणेश नागरगोजे, उपाध्यक्ष तौसिफ आली यांनी केले,तर ऊप अभियंता प्रकाश कांबळे यांनी मानले, सभा यशस्वीतेसाठी संचालक मंडळ व पत संस्था कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.या सभेला सभासद यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती,सभेत असलेल्या अनेक ठरावांना सभासद बांधवांनी मंजूरी दिल्या बाबत व ऊपसिथीत राहिल्या बद्दल संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *