जलधारा येथील शासकिय आश्रम शाळेच्या 11 विद्यार्थ्याना जेवणातुन विषबाधा

हिमायतनगर(प्रतिनिधी)-तालुक्यातील जलधारा येथील शासकिय आश्रम शाळेच्या 11 विद्यार्थ्याना जेवणातुन विषबाधा झाली असुन जलधारा, हिमायतनगर येथे या विद्यार्थ्यांवर उपचार करुन काही विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

जलधारा येथील शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचे नियमीत दि.20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जेवण झाल्यानंतर एका तासाने या शाळेतील चांदणी मेढके, जयश्री डुडूळे, काजल तांबारे, सरिता पिंपळे, दिव्या ढोले, ओमसाई ढाले, श्रध्दा शेळके,वंदना डुकरे, सरिता ढोले या 11 विद्यार्थीना मळमळ, उलटी, चक्कर येत असल्याने या विद्यार्थ्याना शाळेचे अधिक्षक ए.एस.सुर्यवंशी व अन्य शिक्षकानी शाळेच्या जवळच असलेल्या जलधारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी नेले. येथे प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.मात्र या 11विद्यार्थ्यातुन 5 विदयार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.तर शाळेतील 50 विद्यार्थ्याची देखील जलधारा प्रा.आ.केंद्रात येथील वैदयकिय अधिकारी जि.एस.नरवाडे यांनी तपासणी केली आहे.या घटनेची माहीती जलधारा येथील सामाजीक कार्यकर्ते माधव खंदारे, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश शिरडे,पि.एस.मेटकर,बाळु पाचपुते यांनी घटनास्थळी धाव घेवुन याबाबत आ.भिमराव केराम यांना माहीती दिली.असता आ.केराम यांनी प्रशासनाला तात्काळ सुचना देताच किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे एस.एस.टिळे, पाईकराव,तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे यांनी संपुर्ण स्टॉंप सहित शाळेत दाखल होवुन माहीती जाणुन घेतली आहे. शाळेतील उर्वरित विद्यार्थ्याची प्रकृती चांगली असुन प्रशासन याकडे लक्ष देवुन आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *