नांदेड,(प्रतिनिधी)- धर्माबाद येथील एक प्रवाशी आपला मोबाईल ऑटोत विसरून खाली उतरला आणि ऑटो चालकाला मोबाईल वाजण्याचा आवाज आला.चालकाने तो विसरलेला मोबाईल मालकाला परत केला.
रॅम पाटील रा.धर्माबाद अण्णा भाऊ साठे चौक ते रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान रिक्षा मध्ये आपला मोबाईल विसरले.
काही वेळातच रिक्षा मध्ये मोबाईल च आवाज येत होता तेव्हा रिक्षा चालक शेख रफिक याने मागे पाहिले फोन उचलला तेव्हा एक महिला बोलत होती आणि फोन आपला आहे असे सांगत होती. तेव्हा शेख रफिक ने घडलेला प्रकार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले यांना सांगितला आणि वाहतूक पोलीस साखरे यांच्या समक्ष तो विसरलेला मोबाईल प्रवाशी शेख यांना दिला.