
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहर महानगर पालीका निवडणुक निवडणुकीची पुर्व तयारी म्हणुन नांदेड शहर आम आदमी पार्टी युवक शहर शाखेच्या वतिने गणेशनगर पावडेवाडीनाका जवळ मनपा पिण्याच्या पाणी टाकीजवळ आम आदमी पार्टी युवा राज्य उपाध्यक्ष श्री.विजय राठोड व शहर प्रसिध्दी प्रमुख ॲड.शिलवंत भगत,ॲड.विशाल गच्चे यांच्या पुढाकारातून नांदेड शहरातील वंचीत बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थि आंदोलन आणी कांग्रेस पक्षातील मोठ्या संख्येतील नवयुवकांचा पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी छ.शिवाजी महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमांची पुष्पपुजा आम आदमी पार्टी चे जेष्ठ नेते नरेन्द्र सिंघ ग्रंथी,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम,शहरध्यक्ष प्रा.देविदास शिंदे,युवा राज्य उपाध्यक्ष राठोड,ॲड.रितेश पाडमुख,नांदेड विधानसभा प्रमुख,ॲड.जगजीवन भेदे यांच्या हास्ते करण्यांत आली.यावेळी प्रमुख उपस्थीती युवा जिल्हाध्यक्ष अजीत पाटील, ॲड.एम.एन.शिंगे,इंजी.ओवेश,इंजी.कादरी.चाऊस ,निहालसिंग कांचवाले यांची होती.या समयी जेष्ठनेते नरेन्द्र सिंघ ग्रंथी,प्रा.देविदास शिंदे,ॲड.जगजीवन भेदे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.यानंतर वंचीत बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थि आंदोलनाचे नेते श्री.मायाभाऊ नांदेडकर यांच्या नेतृत्वात सम्यक विद्यार्थि आंदोलनाचे व कांग्रेस पक्षाचे शेकडो कार्यक्रते यांनी श्री.मायाभाऊ नांदेडकर, आकाश जोंधळे, महेश सांगलीकर,गजानन अंबेकर रोहीत मिसलवाड,चंद्रकांत आढाव,रणजीत चिणुरकर,विवेक घुगे,शुभम वाघोळे,सतिष गोरे,अनिकेत धुतमल,कुलदिप सातोरे, चंद्रकांत धोतरे,अनिकेत धुतरे, शैलेश घोरपडे,सचिन खोबारे,यांच्यासह शेकडो कार्यक्रत्यांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारत सुर्यवंशी व युवा नेते जयेश चंदेल यांनी केले तर आभार ॲड.शिलवंत भगत यांनी मानले.