नांदेड(प्रतिनिधी)-उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी पोलीसांनी जिल्हाभर आज पथसंचलन करून नवरात्र उत्सवाच्या आनंदात मिठ टाकण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना इशारा दिला आहे.
उद्यापासून नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. नवरात्र उत्सावाची सांगता 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दहा दिवसांमध्ये आनंदाच्या क्षणात कोणाला मिठ टाकायची इच्छा असेल अशा लोकांना शब्दाने न बोलता आपल्या कृतीतून जिल्हा पोलीस दलाने इशारा दिला आहे. जिल्हाभरात आणि नांदेड शहरात आज पोलीसांनी या संदर्भाने पथसंचलन करून आम्ही तयार आहोत हे दाखवले.