नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून त्यात 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
दत्तात्रय शंकरराव बोंढावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 सप्टेंबरच्या पहाटे 5 ते 26 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजेदरम्यान ते आपल्या आजारी सासऱ्यांना भेटण्यासाठी बाहेर गावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी आष्टविनायकनगर भागातील त्यांचे बंद घर फोडले त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे मिळून 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कळणे अधिक तपास करीत आहेत.
दयानंद दिगंबरराव गजभारे यांचे तथागत नगर भागातील घर चोरट्यांनी 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2 ते 3.30 या वाजेदरम्यान कुलूप कोंड्याचे स्कु्र काढून फोडले. घरातील रोख रक्कम 50 हजार आणि एक मोबाईल 10 हजार रुपयांचा असा 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदारा गोणारकर अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद खलील मोहम्मद ईलीयास यांचे घर इमरान कॉलनी देगलूर नाका येथे आहे. 25 सप्टेंबरच्या सकाळी 9 ते 27 सप्टेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान घराचा कुलूप कोंढा तोडून कोणी तरी फोडले. घरातील दीड लाख रुपये रोख रक्कम आणि अडीच ग्रॅम वजनाची एक सोन्याची बाळी असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.
मालेगाव रोडवरून अमित उमाकांत पांडे यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.21 यु.1401 ही 21 सप्टेंबरला रात्री चोरीला गेली. हिमायतनगर ते सिरंजी रस्त्यावरून सायन्ना चिन्नना सल्लेवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एस.9580 ही 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.
तीन घरफोड्या दोन दुचाकी चोऱ्या