वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीचा इफेक्ट
नांदेड(प्रतिनिधी)-27 सप्टेंबर रोजी वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्राम पंचायत विष्णुपूरीने जवळपास 350 लोकांची मान्य करत त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या अतिक्रमीत जागेला कायम करून त्यांची नोंद मालकी हक्कात घेतल्यानंतर आता त्यांना गाव नमुना क्रमांक 8 सुध्दा देण्यात आला आहे.
दि.27 सप्टेंबरपासून ग्राम पंचायत विष्णुपूरी कार्यालयासमोर जवळपास 350 लोकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानुसर त्यांची मागणी होती की, गावातील गायराण जमीनीवर झालेले अतिक्रमण शासनाच्या निर्णयानुसार कायम करून त्यांना मालाकी प्रमाणपत्र द्यावे उपोषणकर्त्यांची सांगितले होते की, गावातील काही लोकांना हे प्रमाणपत्र दिले जात होते. पण इतरांवर मात्र राजकीय सुडातून अन्याय केला जात होता आणि यासाठीच त्यांनी आमरण उपोषणाचे आंदोलन पुकारले होते आणि त्या घटनेला वास्तव न्युज लाईव्हने बातमीच्या स्वरुपात प्रसिध्दी दिली होती.
उपोषणकर्ते भगवान बालाजी हंबर्डे, ऍड. अंगद हंबर्डे, जसबिरसिंघ भाटीया, गंगाधर बगाटे यांनी केलेली मेहनत आणि आलेले यश काल दि.29 सप्टेंबर रोजी दुरध्वनीवरून आंदोलनात यश आल्याची माहिती वास्तव न्युज लाईव्हला दिली. त्यानुसार वास्तव न्युज लाईव्हने बातमी प्रसिध्द केल्यानंतरच आम्हाला न्याय मिळाला अशी उपोषणकर्त्यांची भावना होती. एकंदरीत वास्तव न्युज लाईव्हच्या बातमी प्रसिध्दीला विष्णुपूरी ग्राम पंचायतीने प्रतिसाद दिला आणि जवळपास 30 ते 40 वर्षापासून रखडलेला गाव नमुना क्रमांक 8 चा प्रश्न वास्तव न्युज लाईव्हने बातमी छापल्यावर सुटला आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/09/27/शासनाच्या-निर्णयाची-पायम/