कुंडलवाडी (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण काही कारणामुळे यांची तडकाफडकी बदली नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आल्यामुळे कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे तात्पुरता चार्ज धर्माबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पण आता नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांची दि.२८सप्टेंबर २०२२ रोजी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार कुंडलवाडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ताबडतोब कुंडलवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहुन आपला पदभार स्विकारले आहे.
Related Posts
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन नागपूर(प्रतिनिधी)- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, (जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी,…
स्थानिक गुन्हा शाखेचे संजय केंद्रे यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस हवालदार संजय केंद्रे यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकपदी पदोन्नती झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…