नांदेड(प्रतिनिधी)-अवैध रित्या तीन चाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचा एक अड्डा शहराच्या पश्चिम दिशेला वसलेला आहे. या अड्ड्याच्या जवळ मटक्याची बुक्कीपण आहे. कोणत्याही परिस्थितीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमविण्याचा हा धंदा अत्यंत जोरात या भागात सुरू आहे.
नांदेड शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून त्या गॅस सिलेंडरच्या माध्यमातून तीन चाकी आणि चार चाकी गाड्यांमध्ये तो गॅस भरून कमी वेळेत पैसे कमविण्याचा एक जोरदार धंदा नांदेड शहरात सुरू आहे. यामुळे कमी काळात जास्तीत जास्त पैसे कमावणे हा उद्देश घेवून अनेकांनी हा कारभार चालवला. शहराच्या पश्चिम दिशेच्या शेवटच्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यापासून रेल्वे डिव्हिजनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असाच एक बेकायदेशीर अवैध गॅस पंप एका शटरमध्ये सुरू झाला आहे. एक दुसऱ्यापेक्षा मी किती वरचढ हे दाखविण्यात हा अवैध गॅसपंप जोरदारपणे राजकॉर्नरजवळ सुरू आहे.
तीन चाकी वाहन धारकांना कॉल करून माझ्याकडेच गॅस भरा कारण इतरांचा गॅस पंप मिच बंद पाडणार आहे अशा वल्गना सुध्दा हे अवैध गॅस पंप चालवणारे महाशय करत आहेत. त्यामुळे एखादी बाब आपल्याला करायची असेल तर त्यासाठी इतरांचा सत्यानाश करणे आवश्यक असते. हे दोन नंबरच्या कारभारामध्ये सुध्दा दिसते. या गॅस पंपावर सुध्दा कार्यवाही होण्याची गरज आहे.
राजकॉर्नरजवळ सुध्दा घरगुती गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरण्याचा अड्डा