नांदेड(प्रतिनिधी)-पॅंथर नेत्या तुळसाबाई शंकरराव सोनवणे (वय 100) यांचे शनिवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले आहे. आज दि.2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांची अंतिम यात्रा डॉ.आंबेडकरनगर येथून निघणार आहे.
जुन्या काळातील पॅंथर नेत्या तुळसाबाई शंकरराव सोनवणे यांचे काल रात्री निधन झाले आहे. आज 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांची अंतिम यात्रा निघणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश संघटक, दैनिक रिपब्लिकन गार्डचे मुख्य संपादक विजयदादा सोनवणे, रमेशदादा सोनवणे, दिलीपदादा सोनवणे यांच्या त्या मातोश्री आहेत. युवा पॅंथरचे अध्यक्ष राहुल प्रधान यांच्या त्या आजी आहेत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
पॅंथर नेत्या तुळसाबाई शंकरराव सोनवणे यांचे निधन; आज दुपारी अंतिमसंस्कार