नांदेड(प्रतिनिधी)-सध्याचे सरकार धुर्त आहे तरीपण ग्रामीण जनता ही शिवसेनेच कवचकुंडल आहे, शिवसेना त्यांचे कवचकुंडल आहे आणि मराठी माणसाची शान आहे शिवसेना अशा शब्दात आपले मत व्यक्त करत विधानसभेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे ह्या बोलत होत्या.
बई दार उघड ही मोहिम हाती घेवून निलम गोऱ्हे आणि त्यांच्या अनेक महिला सहकारी नेत्या राज्यभरातील जवळपास 71 देवी मंदिरांना भेट देवून दर्शन घेत आहेत. आज त्या नांदेड जिल्ह्यातील माहुरगडाची आई माता रेणुका आणि माहुरगडाचे मालक भगवान दत्तात्रयाचे दर्शन घेवून नांदेडला पत्रकारांसोबत बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, स्वाती धमाळे, सिकल शेख, शर्मीला येवले, स्थानिक नेते माजी खा.सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, डॉ.मनोज भंडारी, वच्छला पुयड, महेश खेडकर, माजी तालुकाप्रमुख व्यंकोबा येडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना निलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेतून अनेक मंडळी गेल्या. पण त्यांचे पुढे काय झाले हा ईतिहास पाहिला तर आजही शिवसेना खंबीर आहे. भविष्य काळात सर्वांनाच याची प्रचिती येईल की, शिवसेनाच मराठी माणसाची शान आहे. येत्या विजयादशमीच्या मेळाव्यात मागील वर्षभरातच्या घडामोडी येतील आणि त्यात शिवसेना नेते उध्दव ठाकरे जनतेसमोर मांडतील. सध्याचे सरकार हे धुर्त आहे. याचे स्पष्टीकरण सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील हे निश्चितच होते. परंतू देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होती हा धुर्तपणा आहे असे त्यांनी सांगितले. सातत्याने ठाकरे कुटूंबियांची अवहलेना करण्याची पध्दत सुरू झत्तली आहे. पण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे खंबीर आहेत. चांगल्या परिस्थिती दिवाळी सोबत असतात तेंव्हा आणि सोबत नसेल तर शिमगा या परिस्थितीला काय म्हणावे असा प्रश्न उपस्थित केला.मागे काय घडले आणि आता आपण पुढे काय करणार आहोत हाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा उद्देश असतो आणि याही वेळेस असेच घडणार आहे.
लोकशाहीत मतदान हे शस्त्र आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात नवीन मुद्दे येतील आणि त्यावर विश्लेषण होईल. पीएफआय संघटनेची कार्यवाही म्हणजे देशाला आव्हान देणारी परिस्थिती आहे. सोशल मिडीयाचा चुकीचा वापर सुरू झाला असून त्याद्वारे नार्वेकर संपर्कात अशा अफवा पसरवून हवा तयार केली जाते. त्यामुळे शिवसेना ही आजही अभेद्य आहे. काही मोठा परिणाम शिवसेनेवर झालेला नाही. 2019 च्या निवडणुकांचा उल्लेख करून निलम गोरे यांनी सांगितले की, मित्र पक्षांनी धोका दिल्यामुळे आमची आमदार संख्या कमी झाली होती. पण त्याचा परिणाम हा पुढील कालखंडात दिसेलच. ईडी कार्यवाहीबद्दल प्रश्न विचारला असता निलम गोऱ्हे म्हणाल्या की, ईडी आणि सीबीआय यांना चौकशी करण्याचा अधिकारी आहे, ती व्हावी पण तरी पण त्यासाठी एक विहित वेळ सुनिश्चित व्हायला हवी. त्यातून चौकशी किती दिवसात आणि दोषारोपत्र पाठवायचे असेल तर ते किती दिवसात याबाबत सुनिश्चित वेळ आवश्यक असल्याचे निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
सध्याचे सरकार धुर्त आहे-निलम गोऱ्हे