1 लाख 71 हजार 500 रुपये रोख ; 5 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल
नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वामननगर येथील एका शेतामध्ये जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना गजाआड करून त्यांच्याकडून 1 लाख 71 हजार 500 रुपये रोख रक्कमेसह 5 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे, पोलीस उपनिरिक्षक बाचावार, पोलीस अंमलदारा वाघमारे, मुस्तापुरे, देगलूरकर, वळगे, गंदपवाड, तमलुरे, देवकत्ते, क्षीरसागर, चालक झेलेवाड आणि अंगरक्षक आचेवाड यांच्यासोबत त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलीस निरिक्षक शिंदे, पोलीस उपनिरिक्षक वाघमारे, मुस्तापुरे, देगलूरकर, गंदपवाड, कमलुरे यांनी शेताच्या पश्चिम बाजूने आणि पोलीस उपनिरिक्षक बाचावार, आचेवाड, क्षीरसागर, देवकत्ते, भोळे आदींनी दक्षीण बाजूने पायी चालत ते शेत गाठले. 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1.30 वाजता हा छापा टाकण्यात आला. तेथे शेख जावेद सरदार रा.विठ्ठलनगर नायगाव, शिवाजी नागोराव जाधव रा.कृष्णूर, बालाजी तुळशीराम गुडमलवार रा.मुखेड, शिवाजी बाबाराव पाटील रा.मुखेड, पिराजी बालाजी काळमिरे रा.सालेगाव ता.नायगाव, सोमनाथ रावसाहेब बेलके रा.नायगाव, हनमंत गोविंद बोईनवाड, रा.बेळगेनगर नायगाव आणि राजेश शिवाजी सुकने रा.जुने नायगाव अशा 8 जणांना पकडले. त्यांच्याकडून 1 लाख 71 हजार 500 रुपये रोख रक्कम, सहा मोबाईल किंमत 41 हजार रुपये आणि 7 दुचाकी गाड्या किंमत 3 लाख 12 हजार रुपये असा एकूण 5 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 144/2022 मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार मुस्तापुरे हे करणार आहेत.
नायगावचा जुगार अड्डा सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी उदवस्त केला