नांदेड (प्रतिनिधी)- येथील विभागिय समाज कल्याण आयुक्त कार्यालया समोर दि.३/१०/२२ रोजी विद्यार्थियांच्या मागण्या साठी आंदोलन केले.
या आंदोलनाचे आयोजन आम आदमी पार्टी चे युवा नेते मायाभाऊ नांदेडकर यांनी केले.तर आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टी चे जेष्ठ नेते नरेन्द्र सिंघ ग्रंथी व नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभाप्रमुख ॲड.जगजीवन भेदे,यांनी केले.यावेळी मा.समाज कल्याण विभागीय आयुक्त श्री.माळवतकर साहेब यांना मागणी १)डॅा.बाबासाहेब अंबेडकर स्वाधार योजनेची ईयत्ता १०वी,१२वी पात्रतेची ५०%ची अट रद्द करा.२)स्वाधार योजना ही तालुकाच्या ठिकाणी सुध्दा सुरु करा.३)स्वाधार योजना पात्र झालेल्या विद्यार्थियांच्या खात्यात जमा करा.४)२० मार्च २०२१ चा जि.आर रद्द करून विद्यार्थियांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करा. व कोंचिग फिस काॅलेज च्या खात्यात जमा करा.५)शैक्षणीक वर्ष २०२२-२३ पासुन स्वाधार योजनेची रक्कम ४८०००रुपया वरुन वाढवुन ती ६५०००रू.करावी.६)परराज्यातील ओ.बि.सि.विद्यार्थियांची बंद केलेली शिष्यवृत्ती तात्काळ सुरु करा.७)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा हा महाराष्ट्रातील प्रत्येक समाज कल्याण कार्यालयासमोर उभा करण्यात यावा.या मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात आम आदमी पार्टी चे जेष्ठ नेते नरेन्द्र सिंघ ग्रंथी,नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभा प्रमुख ॲड जगजीवन भेदे, युवा नेते मायाभाऊ नांदेडकर,प्रशांत खिल्लारे,अभिमान राऊत,हर्षवर्धन कापशीकर,सत्यपाल सावंत,चंदु आढाव,सोनु बिल्डर,सुशील नरवाडे यांच्या सह शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.