नांदेड(प्रतिनिधी)-राजकॉर्नरजवळ अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर बदलून बेकायदेशीररित्या वाहनात भरण्याचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. यावर कोणत्याही प्रशासनातील अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही.
राज कॉर्नरजवळ एका अंडरग्राऊंड दुकानामध्ये घरगुती गॅस सिलेंडर ठेवलेले असतात या गॅस सिलेंडरचा बदल वाहनात करण्याची संपूर्ण यंत्रणा तेथे उपलब्ध आहे. तेथून पध्दतशिरपणे पेट्रोलपंपासारखा पंप बाहेर आलेला असतो आणि त्यातून घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरला जातो. या सर्व गॅसची किंमत 90 रुपये किलो आकारली जाते. असाहा हा घरगुती गॅस सिलेंडरचा धंदा सुरू आहे. वास्तव न्युज लाईव्हने या संदर्भात या अगोदर सुध्दा वृत्तलेखन केले होते. परंतू अशा वृतलेखनाने माझे काही बिघडत नाही असे या अवैध धंदा करणाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासन सुध्दा माझ्या हातातील खेळणे आहे असा प्रचार सुध्दा हा गॅस बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरणाऱ्याचा प्रचार आहे. याभागात पोलीस यंत्रणा सुध्दा याबाबीकडे दुर्लक्ष करते.
मुळात अवैध प्रकारे गॅसचा वापर होत असेल तर त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी महसुल प्रशासनातील लोकांची आहे. आता पोलीस त्याच्या खिशात असतील तर इतर मंडळी अर्थात महसुल विभागपण त्यांच्याच खिशात असेल अशा प्रकारे कमी मेहनतीत लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे कमावण्याचा गरगुती गॅस सिलेंडरचा गॅस वाहनांमध्ये भरण्याचा धंदा अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. राजकॉर्नरजवळ सुरू असलेल्या या अवैध गॅसचा धंदा अत्यंत उत्कृष्टपणे सुरू आहे.