पोलीस अंमलदार शिवाजी नाईक यांचे निधन; आज सायंकाळी सात वाजता अंतिमसंस्कार

 

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार शिवाजी नाईक वय 42 यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर हतनाळा तालुका मुखेड येथे आज सायंकाळी सात वाजता अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.

जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस अंमलदार शिवाजी हनुमंतराव नाईक (42) यांची सध्याची नियुक्ती गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड येथे होती. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम करून उत्कृष्ट खेळाडू असणाऱ्या शिवाजी नाईक यांनी अनेक पोलीस स्पर्धा मध्ये ब‌क्षीसे मिळवली आहेत. आज 10 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर आजारासाठी उपचार सुरू होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सात वाजता हतनाळा तालुका मुखेड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

नेहमीच हसतमुख काम करणारे व्यक्ती म्हणून शिवाजी नाईक यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलीस दलाने आणि त्यांच्या अनेक मित्रांनी शिवाजी नाईक यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *