लोहा,(प्रतिनिधी)- लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक युवती पळून गेल्या प्रकरणी एका 25 वर्षीय युवकावर संशय घेऊन चार जणांनी त्यांना मारहाण केली. या महाराणी नंतर त्याने विष प्राशन केल. हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे या सदराखाली लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवनंदा मारुती लुंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावातील शरद नामदेव पवार, गणेश शामराव पवार, आणि शिवाजी नामदेव पवार यांच्यासह एक अनोळखी मुलगा अशा चार जणांनी त्यांचा मुलगा दत्ता मारुती लुंगारे (25) यास दि. 9 ऑक्टोबर रोजी मारहाण केली हा प्रकार तहसील कार्यालय लोहाच्या पाठीमागे घडला.मारहाण करणाऱ्यांना शरद नामदेव पवार यांची मुलगी निघून गेल्याच्या मागे दत्ता मारुती लुंगारे यांचा हात आहे असा संशय होता. या संशयाच्या कारणावरूनच चार जणांनी दत्ता मारुती लुंगारेला मारहाण केली आणि त्या मारहाणी मधून झालेल्या अपमानामुळे दत्ता लुंगारे ने विषारी औषध प्राशन करून मरणास जवळ केले. हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
लोहा पोलिसांनी शिवनंदा लुंगारे यांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 324,323, 306,34 नुसार गुन्हा क्रमांक 202/2022 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे करणार आहेत.