नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूनगर भागात एका पोलीसाला मारहाण झाल्याचा प्रकार परवा रात्री घडला आहे. कोणीही पोलीस या घटनेला दुजोरा देत नाही.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूनगर भागात एका पोलीस अंमलदाराला रात्रीच्यावेळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस विभागाकडे विचारणा केली असता कोणीच त्यास दुजोरा देत नाही. परंतू घडलेला घटनाक्रम गुरूनगर भागातील अनेक नागरीक सांगतात.
पोलीसाला मारहाण झाली आणि त्यासंदर्भाने कोणतीही नोंद कोठेही झाली नाही ही बाब जास्त गंभीर आहे. नोंद का झाली नसेल ? हे लिहुन आम्ही वाचकांचा वेळ नष्ट करू इच्छीत नाही. पोलीसाला मारहाण झाली ही बाब तशी गंभीर आहे. परंतू त्याबद्दल कोठेच तक्रार नाही, कोणीच पोलीस त्याबद्दल बोलत नाही किंवा त्या घटनेला दुजोरा देत नाही ही बाब त्यापेक्षा भयंकर आहे.
विमानळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूनगरमध्ये घडली पोलीसाला मारहाणीची घटना ?