नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड तर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिवस “म्हणून महापालिकेत साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आज सकाळी 11 वाजता महापौर सौ. जयश्री निलेश पावडे शुभ हस्ते माजी राष्ट्रपती स्व.डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, प्रशिक्षण हॉल येथे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ,स.सदस्या सरिता बिरकिले,सहाय्यक आयुक्त संजय जाधव, संजीव कारले, राजकुमार लोहिया,गौतम कवडे, यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती.