नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत घरगुती गॅसचा वापर प्रवाशी वाहनांमध्ये इंधन म्हणून करतांना गॅस माफियांनी लढवलेली शक्कल नाविन्यपुर्ण आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅसचा वापर प्रवाशी वाहनांत इंधनम्हणून भरून देण्याचे एक अवैध पंप सुरू होते. याबद्दल वास्तव न्युज लाईव्हने लिखाण केल्यानंतर पोलीसांनी त्यांना चांगलीच समज दिली होती. पण कमी मेहनतीमध्ये आणि चुकीच्या मार्गाने लवकरात लवकर पैसे कमवण्याची वृत्ती आणि त्यातील मोठ-मोठी मंडळी आणि मोठ्या मंडळीच्या वडछायेत जगणारी छोटी-छोटी मंडळी हे काम करतच आहे. अशाच पध्दतीने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नरजवळ चालणाऱ्या अवैध गॅस पंप चालकांनी पोलीसांच्या आदेशानुसार गॅस पंप तर बंद केला. पण त्यात एक शानदान आणि न दिसण्यासारखी लोखंडी खिडकी लावली. एखादी प्रवाशी वाहन तेथे घरगुती गॅस वाहनात भरण्यासाठी आले की, त्या छुप्या खिडकीतून वाहनात गॅस भरणारा पाईप बाहेर येतो आणि काही मिनिटात ते गॅस भरणे संपते आणि ती गुपचुपची खिडकी बंद केली जाते. त्यामुळे या ठिकाणी अवैध प्रकारे चालणारा हा घरगुती गॅस पंप अव्याहत पणे सुरूच आहे. छायाचित्रात दिसणारा ऍटो रिक्षा सुध्दा याच गुपचूपच्या खिडकीतून आपल्या वाहनात घरगुती गॅस भरून घेत आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/10/05/राजकॉर्नरजवळ-अवैधरित्या/