नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत मिलगेटजवळ मटक्याचा बाजार भरतो त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन एका युवकाने व्हाटसऍप संकेतस्थळावर तो व्हिडीओ पोस्ट केलेला आहे.
आमच्याकडे काहीच नाही, आमचा साहेब लई छान, आमच्या साहेबांना काही वाईट चालत नाही असा प्रचार पोलीस विभागात एक दुसऱ्याची बाजू सांभाळण्यासाठी नेहमीच होत असतो. नांदेडच्या वजिराबाद भागाचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आहेत. वजिराबादला येण्याअगोदर त्यांनी बऱ्याच पोलीस ठाण्यात आपली सेवा दिली आहे. तसेच त्यांनी हिंगोली जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेचे काम पण केलेले आहे.
आज दुपारी एका युवकाने आपल्या मोबाईलनंबरवरून वजिरबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरणाऱ्या मटका बाजाराचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते चित्रीकरण व्हाटसऍप गु्रपवर प्रसिध्द केले. वास्तव न्युज लाईव्हने त्या युवकाशी संपर्क करून विचारणा केली असता हा व्हिडीओ मिच केलेला आहे आणि अशा मोठ्या स्वरुपाचा मटक्याचा बाजार या भागात भरतो असे त्याने सांगितले. हे सांगत असतांना त्या युवकाने आणखी एक बाब सांगितली की, या मटक्याच्या बाजारात एका महिलेने येवून धिंगाना घातला होता. ती महिला मटका चालविणाऱ्याला सांगत होती की, माझा नवरा इथे येवून सर्व पैसे मटक्यात टाकतो तुमच्यामुळे माझ्या घरातील शांतता भंग झाली आहे. अशा पध्दतीने सर्वसामान्य माणसाच्या कुटूंबाचे वाटोळे करणारा हा मटक्याचा बाजार वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत जोरदारपणे आणि पुर्ण ताकतीने सुरू आहे. काय असेल ही ताकत ज्याच्या जोरावर मटका चालक असे करतात हा एक मोठा शोध विषय आहे.पण मटक्याचा बाजार पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत सुरू आहे हे मात्र त्रिवार सत्य आहे.
संबंधीत व्हिडिओ…