शासनाची दिवाळी भेट; कर्मचाऱ्यांना शुक्रवारी मिळणार ऑक्टोबरचे वेतन

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने यंदाच्या दिवाळीला शासकीय कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. परवाच्या दिवशी, शुक्रवारी शासकीय कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार वितरीत करावा असे आदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाच्यावतीने जारी झाला आहे. या आदेशावर वित्त विभागाचे उपसचिव इंद्रजित गोरे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
यंदा दिवाळी 23 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने शासनाने कोषागार नियमांमधील काही तरतुदींना शितीलता देवून ऑक्टोबर महिन्याचा पगार जो नोव्हेंबर महिन्यात दिला जातो. तो यंदाच्या दिवाळी अगोदर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मिळणारा पगार या महिन्यात परवा शुक्रवारी दि.21 ऑक्टोबर 2022 रोजी कर्मचाऱ्यांना वितरीत केला जाणार आहे. हा शासन निर्णय जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापिठे त्यांना सलग्न अशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारक यांना सुध्दा लागू होणार आहे. शासनाचे हे परिपत्रक शासनाने राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक क्रमांक 202210181359284005 नुसार प्रसिध्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *