नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील वाहतूकीवर नियंत्रण नाही याचे एक चित्र आज वजिराबाद अर्थात हनुमानपेठ या परिसरात पाहायला मिळाले. वेगवेगळ्या तीन रस्त्यांवर जाम झालेली वाहतुक काढण्यासाठी कोणीच पोलीस हजर दिसला नाही.
नांदेड शहरात वाहतुक शाखेवरील ताण लक्षात घेता माजी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी एका वाहतुक शाखेच्या दोन वाहतुक शाखा केल्या. त्यात वाहतुक शाखा क्रमांक 1 चे कार्यालय वजिराबाद पोलीस ठाण्यात आहे तर वाहुतक शाखा 2 चे कार्यालय इतवारा पोलीस ठाण्यात आहे. या दोन विभाग करण्यामागील भावना अशी होती की, अचानकपणे कांही परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीच्या ठिकाणी जलदगतीने मदत जावी आणि वाहतुक सुरळीत व्हावी. ही जबाबदारी पार पाडण्याचे काम वजिराबाद येथे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे पार पाडतात. इतवाराची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते यांची आहे.
आज दि.21 जून रोजी दुपारी 2 वाजता वजिराबाद भागातील उत्तरेकडून दक्षीणेकडे, दक्षीणेकडून उत्तरेकडे आणि पुर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी तीन रस्त्यांवर झाली. वाहन चालक आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवित होते. पण प्रत्येकाला लवकरच जायची घाई होती. त्यामुळे ही वाहतुक कोंडी अर्धा तास तशीच दिसत होती. अखेर वाहन चालकांनी आपली गरज समजुन हळूहळू एक दुसऱ्याशी हात मिळवत एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे वाहतूक कोंडी सोडवली आणि आप-आपल्या गतंव्याकडे निघून गेले.
अर्धा तास सुरू असलेल्या या वाहतुक कोंडी माहिती वाहतुक शाखेपर्यंत पोहचलीच नाही आणि त्यामुळेच वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबाद येथील कोणीच अधिकारी, अंमलदार वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तेथे पोहचलाच नाही.
वाहतूक शाखा क्रमांक 1 चे वाहतुक कोंडीकडे दुर्लक्ष